Tamasha – वैरी भेदला…….तमाशा अर्थात वगनाट्य किंवा लोकनाट्य

Vagnatya Tamasha is a comedy act and a folk drama commonly known as Lokanatya aka Tamasha in Maharashtra. It’s in Marathi Language.

It contains Gan – a prayer to Lord Ganesh to help artist in the performance. Generally this Gan is sung by Shair – a leader and who writes this Vaganatya and all the songs including Lavani in it. After Gan, Gavalan – a song by Gopika and Radha performed.

…Then comes a Batawani

…which is a comedy discussion between characters like Kanha, Pendya, Mavashi, Radha etc. After Batawani, there comes a main act known as Vag, so the name is Vaganatya. This description is for a comedy folk drama book “Vagnatya – Vairi Bhedala Arthat Premala Seema Nahi” written by Shahir Pashanbhed – Sachin Borse. It has all the sections of a typical Vagnatya like Purvarang – Gan, Gavalan, Batawani, Lavani and Uttar-Rang – Vaganatya. Hope you are interested reading this Comedy act – a folk drama and like this website also. Here you can find more information of Vaganatya Tamasha Vairi Bhedala book and its contains.

वगनाट्य तमाशा हा एक मराठी भाषेतील लोकरंजनासाठी सादर होणार लोकनाट्याचा किंवा नाटकाचा एक प्रकार आहे. यास तमाशा असेही म्हटले जाते. हा एक विनोदी नाट्यप्रकार आहे. असे नाट्य महाराष्ट्रात रंगमंचावर सादर होते.

त्यात सुरूवातीला गण सादर होतो. गणात ‘नाट्यप्रयोग करतांना सहकार्य कर’ अशी देव गणेशाची प्रार्थना शाहीर करतात. शक्यतो शाहीरांनीच वगनाट्य तमाशातील कवने, गण, लावणी, गौळण आदी साहीत्यप्रकार लिहीलेले असतात. गणानंतर गौळण सादर केली जाते जी राधा अन तिच्या सख्या मैत्रीणी गोपीका आदी गावून नाचून सादर करतात. आणि त्यानंतर बतावणी सादर होते. बतावणीत पेंद्या, मावशी, कान्हा यांचे खुसखुशीत संवाद होतात. त्यानंतर वग हा मुख्य नाट्याचा प्रकार सादर होतो. या वगावरूनच वगनाट्य हे नाव आले आहे.

वरील सारे नाट्यभाग “वगनाट्य – वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही” या शाहीर पाषाणभेद- सचिन बोरसे यांनी लिहीलेल्या वगनाट्य तमाशात आलेले आहेत. यात वगनाट्यातील पुर्वरंगातील गण, गवळण, बतावणी, लावणी आणि उत्तररंगातील मुख्य वग आदी भाग आहेत.

कोणत्याही कागदावर कच्चा खर्डा न लिहीता सर्वात प्रथम इंटरनेटवरवरील टायपींग एडीटर वापरून लिहीलेले, पुर्ण संहीता असणारे आणि इंटरनेटवरच प्रकाशित होणारे त्याचप्रमाणे वगनाट्य तमाशासाठीच्या पुस्तकाची वेबसाईट असणारे हे प्रथम वगनाट्य आहे हे आपणास सांगतांना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. आम्हास आशा आहे की सदर वगनाट्य-तमाशाची संहीता असणारे हे पुस्तक आपणास आवडेल. “वगनाट्य – वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही” या पुस्तकाच्या अधीक माहीतीसाठी आपण येथे वाचू शकता.