पुस्तक – वगनाट्य: वैरी भेदला

पेंद्या: इश्टाप! इश्टाप!! इश्टाप!!!
मावशी: ए मुडद्या काय “इश्टाप इश्टाप इश्टाप” करतूया? इथं काय लपाछपीचा खेळ चालू हाय का?
पेंद्या: इश्टाप इश्टाप इश्टाप म्हंजे विंग्रजीत “Do not Start” आपनबी आता ‘हासुरे’ विंग्रजीचा क्लास लावलाय सध्या.
गवळणः ये बाबा जरा मराठीत समजल आसं बोल. नायतर मनसे बोलाया लावीन बघ.

प्रधानजी: मुजरा असावा.
महाराज: असो असो. प्रधानजी, ही काय दरबारात येन्याची वेळ झाली का? आता दहा वाजून गेलं तरीबी दरबारात कोनीच कसं नाही. आन तुमीसुदीक लेट झालात? आता केजरीवाल ब्रांडचे दोन झाडू आणा. एक तुमी घ्या अन एक माझ्या हातात द्या. अन करू सुरूवात आपण दोघं दरबाराच्या साफसफाईला.
प्रधानजी: हो महाराज.
महाराज: अरे परधान हाय का बारदान? मी बोलतो अन तुमी खुशाल हो म्हनताय. काय लाज? काय शरम वाटती का न्हाय?

वरील खुशखुषीत संवाद आहेत “वगनाट्य – वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही” या विनोदी वगनाट्यातील.

अवंतिपूरचा राजा चतूरसेन गुण्यागोविंदाने राज्य करत असतो. त्या राज्याचा खरा शत्रू कोण असतो? राजपुत्र शुरसेनाला राजकन्या सुनयना मिळते का?
चतूरसेन अन त्याची अप्सरेप्रमाणे असणारी पत्नी आपल्या लाडक्या शुरसेनाला गमावतात का?
हवालदार मैनावतीच्या कोणत्या लावण्या ऐकतो?

या सार्‍या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत “वगनाट्य – वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही” या लोकनाट्य तमाशाप्रधान पुस्तकात!

तमाशा वगनाट्यातील पुर्वरंगातील गण, गवळण, बतावणी, लावणी आणि उत्तररंगातील मुख्य वग आदींचा आस्वाद घ्यायचा असेल तर वाचायलाच हवे “वगनाट्य – वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही”.

सदर पुस्तक सुरक्षित व्यवहाराद्वारे ऑनलाईन पद्धतीने छापील किंमतीतच घरपोच मागवा. किंमत आहे रू. ६५/- फक्त.

“वगनाट्य – वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही” हे पुस्तक अ‍ॅमेझॉन.इन आणि बुकगंगा.कॉम या वेबसाईट्सवर उपलब्ध.

पुस्तक मागविणेसाठी खालील लिंक्सवर क्लिक करा. सदर पुस्तक खालील वेबसाईट्सवर उपलब्ध आहे.  • ISBN-13: 978-9352677702

You can purchase this book on:
Amazon
Bookganga

Visit this book on Facebook: https://www.facebook.com/Vagnatya/